Skip to main content

पाथर्डी तालुक्यातील कोल्हार येथील जागृत देवस्थान कोल्हुबाई मातेच्या यात्रा उत्सवाची जय्यत तयारी!

पाथर्डी तालुक्यातील कोल्हार येथील जागृत देवस्थान कोल्हुबाई मातेच्या यात्रा उत्सवाची जय्यत तयारी! कोल्हुबाई मातेच्या गडावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी केली जाणार आहे अशी माहिती कोल्हार गावच्या यात्रा उत्सव कमिटीने दिली आहे. दिनांक ८एप्रिल पासून सकाळी ८ते ११कावडी मिरवणूक होणार आहे. यानंतर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी केली जाणार आहे. सायंकाळी ७ ते ९वाजता भव्य दिव्य अशी छबिना पालखी मिरवणूक त्यानंतर ९.३०ते१२.३०जुई शेरकर लावण्या तारक्या पुणेकर यांचा ऑर्केस्ट्रा कार्यक्रम होणार आहे. दिनांक 9 रोजी सकाळी ८वाजता कलावंतांच्या हजेरी कार्यक्रम त्यानंतर  दुपारी ३.३०वाजता नामांकित पैलवानांचा कुस्ती हंगामा होणार . ६ नंतर यात्रेची सांगता होणार आहे. तरी सर्व पंचक्रोशीतील भाविकांना गावच्या यात्रा कमिटीच्या वतीने विनंती केली आहे. यावेळी सरपंच श्री.राजू नेटके उपसरपंच श्री. गोरक्षनाथ पालवे मेजर श्री संभाजी पालवे श्री.महादेव हरी पालवे गुरुजी, सोपानराव पालवे, शंकरराव डमाळे, श्री.बाबाजी नाथा पालवे जय हिंद फाउंडेशनचे श्री. शिवाजीराजे पालवे,श्री शिवाजी गर्जे, श्री श्री ज्ञानेश्वर गीते. किशोर शंकर पालवे...

संजय गांधी निराधार योजना कोण कोण आहेत लाभार्थी

 *संजय गांधी निराधार योजना*

निराधार महिला-पुरुष, अपंग, दुर्धर आजार झालेले, निराधार विधवा तसेच स्वावलंबन गमावलेल्यांना किमान आर्थिक मदत देऊन त्यांच्या गरजा भागविण्याचा प्रयत्न करणे हा या योजनेचा उद्देश आहे. लाभार्थी

१. ६५ वर्षाखालील निराधार पुरुष-महिला

२. अनाथ मुले, अपंगातील सर्व प्रवर्ग

३. क्षयरोग, एड्स, कर्करोग, कुष्ठरोग यामुळे स्वतःचा चरितार्थ चालवू न शकणारे

४. निराधार विधवा. यात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवा

५. घटस्फोटीत परंतु पोटगी न मिळालेल्या महिला

६. अत्याचारित व वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला

७. तृतीयपंथ, देवदासी

८. तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्याची बेरोजगार पत्नी

९. ३५ वर्षांवरील अविवाहित बेरोजगार महिला

१०. सायकलग्रस्त

अटी

लाभार्थ्याचे नाव दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत असणे आवश्यक. • लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न २१ हजार रुपयांच्या आत हवे.

Comments