पाथर्डी तालुक्यातील कोल्हार येथील जागृत देवस्थान कोल्हुबाई मातेच्या यात्रा उत्सवाची जय्यत तयारी! कोल्हुबाई मातेच्या गडावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी केली जाणार आहे अशी माहिती कोल्हार गावच्या यात्रा उत्सव कमिटीने दिली आहे. दिनांक ८एप्रिल पासून सकाळी ८ते ११कावडी मिरवणूक होणार आहे. यानंतर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी केली जाणार आहे. सायंकाळी ७ ते ९वाजता भव्य दिव्य अशी छबिना पालखी मिरवणूक त्यानंतर ९.३०ते१२.३०जुई शेरकर लावण्या तारक्या पुणेकर यांचा ऑर्केस्ट्रा कार्यक्रम होणार आहे. दिनांक 9 रोजी सकाळी ८वाजता कलावंतांच्या हजेरी कार्यक्रम त्यानंतर दुपारी ३.३०वाजता नामांकित पैलवानांचा कुस्ती हंगामा होणार . ६ नंतर यात्रेची सांगता होणार आहे. तरी सर्व पंचक्रोशीतील भाविकांना गावच्या यात्रा कमिटीच्या वतीने विनंती केली आहे. यावेळी सरपंच श्री.राजू नेटके उपसरपंच श्री. गोरक्षनाथ पालवे मेजर श्री संभाजी पालवे श्री.महादेव हरी पालवे गुरुजी, सोपानराव पालवे, शंकरराव डमाळे, श्री.बाबाजी नाथा पालवे जय हिंद फाउंडेशनचे श्री. शिवाजीराजे पालवे,श्री शिवाजी गर्जे, श्री श्री ज्ञानेश्वर गीते. किशोर शंकर पालवे...
वन्यजीवांमुळे नुकसान झाल्यास अर्थसहाय्य कसे मिळणार
वन्यजीवांमुळे नुकसान झाल्यास अर्थसहाय्य वन्यप्राण्यांकडून शेतकऱ्यांचे पिकांचे, फळबागांचे, ऊसाचे नुकसान झाल्यास, वन्य प्राण्याच्या हल्ल्यात व्यक्तीचा अगर पाळीव प्राण्यांचा मृत्यू झाल्यास वनखात्याकडून नुकसान भरपाई दिली जाते. वन्यप्राण्याच्या हल्ल्यात व्यक्ती जखमी झाल्यास त्यापोटीतसेच वैद्यकीय उपचारासाठी मदत केली जाते.
वनखात्यातर्फे मिळणारी नुकसान भरपाई पुढीलप्रमाणे
वन्यप्राण्याच्या हल्ल्यात मृत्यू : १५ लाख रुपये
कायमचे अपंगत्व आल्यास : ५ लाख रुपये
वन्यप्राण्याच्या हल्ल्यात किरोकोळ जखमी झाल्यास, औषधोपचाराचा खर्च
मिळतो.
पशुधनाची व पिकांची नुकसान भरपाई
वन्य प्राण्याच्या हल्ल्यात पशुधनाचा मृत्यू झाल्यास अगर ते गंभीर जखमी झाल्यास (गाय, म्हैस, बैल, शेळी, मेंढी) त्यापोटीही नुकसान भरपाई दिली जाते. पिकांचे नुकसान झाल्यास नुकसानीच्या प्रमाणात वनखात्याकडून नुकसान भरपाई दिली जाते. नुकसानीची टक्केवारी वनखाते निश्चित करते.
संपर्क
वनखात्याचे गाव व तालुका पातळीवरील वनपरिक्षेत्र कार्यालय, तलाठी..
Comments
Post a Comment