Skip to main content

Posts

Showing posts from 2023

पाथर्डी तालुक्यातील कोल्हार येथील जागृत देवस्थान कोल्हुबाई मातेच्या यात्रा उत्सवाची जय्यत तयारी!

पाथर्डी तालुक्यातील कोल्हार येथील जागृत देवस्थान कोल्हुबाई मातेच्या यात्रा उत्सवाची जय्यत तयारी! कोल्हुबाई मातेच्या गडावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी केली जाणार आहे अशी माहिती कोल्हार गावच्या यात्रा उत्सव कमिटीने दिली आहे. दिनांक ८एप्रिल पासून सकाळी ८ते ११कावडी मिरवणूक होणार आहे. यानंतर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी केली जाणार आहे. सायंकाळी ७ ते ९वाजता भव्य दिव्य अशी छबिना पालखी मिरवणूक त्यानंतर ९.३०ते१२.३०जुई शेरकर लावण्या तारक्या पुणेकर यांचा ऑर्केस्ट्रा कार्यक्रम होणार आहे. दिनांक 9 रोजी सकाळी ८वाजता कलावंतांच्या हजेरी कार्यक्रम त्यानंतर  दुपारी ३.३०वाजता नामांकित पैलवानांचा कुस्ती हंगामा होणार . ६ नंतर यात्रेची सांगता होणार आहे. तरी सर्व पंचक्रोशीतील भाविकांना गावच्या यात्रा कमिटीच्या वतीने विनंती केली आहे. यावेळी सरपंच श्री.राजू नेटके उपसरपंच श्री. गोरक्षनाथ पालवे मेजर श्री संभाजी पालवे श्री.महादेव हरी पालवे गुरुजी, सोपानराव पालवे, शंकरराव डमाळे, श्री.बाबाजी नाथा पालवे जय हिंद फाउंडेशनचे श्री. शिवाजीराजे पालवे,श्री शिवाजी गर्जे, श्री श्री ज्ञानेश्वर गीते. किशोर शंकर पालवे...

श्रावणबाळ सेवानिवृत्ती योजना कोण आहेत लाभार्थी

श्रावणबाळ सेवानिवृत्ती योजना समाजातील निराधार ज्येष्ठनागरिकांना आधार मिळावा या दृष्टीने ही योजना राबवली जाते. जीवनावश्यक गरजांसाठी अल्प का होईना मदत करण्याचा हेतू या योजने मागे आहे. ही योजना सर्व प्रवर्गातील वयाची ६५ वर्षे पूर्ण केलेल्या व्यक्तींना लागू आहे. लाभार्थी - गट अ - वयाची ६५ वर्षे अगर त्याहून अधिक वय असलेली व्यक्ती. दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव समाविष्ट असणे आवश्यक. कागदपत्रे १. आधार कार्ड २. क्रेडिट कार्ड ३. देखींग कार्ड ४. वयाचा दाखला किंवा टी.सी. ५. वैद्यकीय सर्टिकेट ६. हयातीचा दाखला ७. दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील सदस्य असल्याचा पुरावा अगर दाखला ८. आधारशी संलग्न बँकखाते ९. वार्षिक उत्पन्न २१ हजारापेक्षा कमी असल्याचा दाखला १०. पासपोर्ट फोटो- २ संपर्क तलाठी, तहसीलदार, जिल्हाधिकारी कार्यालय, नागरी सुविधा केंद्र.

वन्यजीवांमुळे नुकसान झाल्यास अर्थसहाय्य कसे मिळणार

वन्यजीवांमुळे नुकसान झाल्यास अर्थसहाय्य कसे मिळणार वन्यजीवांमुळे नुकसान झाल्यास अर्थसहाय्य वन्यप्राण्यांकडून शेतकऱ्यांचे पिकांचे, फळबागांचे, ऊसाचे नुकसान झाल्यास, वन्य प्राण्याच्या हल्ल्यात व्यक्तीचा अगर पाळीव प्राण्यांचा मृत्यू झाल्यास वनखात्याकडून नुकसान भरपाई दिली जाते. वन्यप्राण्याच्या हल्ल्यात व्यक्ती जखमी झाल्यास त्यापोटीतसेच वैद्यकीय उपचारासाठी मदत केली जाते. वनखात्यातर्फे मिळणारी नुकसान भरपाई पुढीलप्रमाणे वन्यप्राण्याच्या हल्ल्यात मृत्यू : १५ लाख रुपये कायमचे अपंगत्व आल्यास : ५ लाख रुपये वन्यप्राण्याच्या हल्ल्यात किरोकोळ जखमी झाल्यास, औषधोपचाराचा खर्च मिळतो. पशुधनाची व पिकांची नुकसान भरपाई वन्य प्राण्याच्या हल्ल्यात पशुधनाचा मृत्यू झाल्यास अगर ते गंभीर जखमी झाल्यास (गाय, म्हैस, बैल, शेळी, मेंढी) त्यापोटीही नुकसान भरपाई दिली जाते. पिकांचे नुकसान झाल्यास नुकसानीच्या प्रमाणात वनखात्याकडून नुकसान भरपाई दिली जाते. नुकसानीची टक्केवारी वनखाते निश्चित करते. संपर्क वनखात्याचे गाव व तालुका पातळीवरील वनपरिक्षेत्र कार्यालय, तलाठी..

संजय गांधी निराधार योजना कोण कोण आहेत लाभार्थी

 *संजय गांधी निराधार योजना* निराधार महिला-पुरुष, अपंग, दुर्धर आजार झालेले, निराधार विधवा तसेच स्वावलंबन गमावलेल्यांना किमान आर्थिक मदत देऊन त्यांच्या गरजा भागविण्याचा प्रयत्न करणे हा या योजनेचा उद्देश आहे. लाभार्थी १. ६५ वर्षाखालील निराधार पुरुष-महिला २. अनाथ मुले, अपंगातील सर्व प्रवर्ग ३. क्षयरोग, एड्स, कर्करोग, कुष्ठरोग यामुळे स्वतःचा चरितार्थ चालवू न शकणारे ४. निराधार विधवा. यात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवा ५. घटस्फोटीत परंतु पोटगी न मिळालेल्या महिला ६. अत्याचारित व वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला ७. तृतीयपंथ, देवदासी ८. तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्याची बेरोजगार पत्नी ९. ३५ वर्षांवरील अविवाहित बेरोजगार महिला १०. सायकलग्रस्त अटी लाभार्थ्याचे नाव दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत असणे आवश्यक. • लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न २१ हजार रुपयांच्या आत हवे.

महात्मा फुले जन आरोग्य योजनेबद्दल माहिती

 महात्मा फुले जन आरोग्य योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांना आरोग्य सुविधा देणे, दारिद्र्यरेषेखालील व वरील रुग्णांना गंभीर व खर्चिक आजारावरील मोफत उपचार देणे. लाभार्थी दारिद्र्यरेषेखालील पिवळे, अंत्योदय, अन्नपूर्णा योजना दारिद्र्यरेषेवरील केशरी शिधापत्रिका धारक, शेतकरी आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यातील पांढरे शिधापत्रिकाधारक शेतकरी, ही योजना राष्ट्रीय विमा कंपनीच्या सहकार्याने राबविली जाते. सारे ९०० आजारांवर या योजनेतून उपचार केला जातो.. या योजनेअंतर्गत विमा संरक्षण रक्कम प्रती वर्ष प्रतिकुटुंब २ लाख रुपये आहे. मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी ३ लाख रुपये आहे. (यात वेळोवेळी बदल होतो.) कागदपत्रे स्मार्ट कार्ड, आधार कार्ड, शिधापत्रिका, केंद्र व राज्य शासनाने विहित केलेले कोणतेही ओळखपत्र. संपर्क सूचीबद्ध रुग्णालय सदर योजना बहुतांश रुग्णालयात लागू आहेत. तालुका, जिल्हा आरोग्य अधिकारी, खासगी रुग्णालयातील आरोग्य मित्र, समाजसेवक, लोकप्रतिनिधींचे कार्यालय.